Monday, August 24, 2026
HomeSocialशाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर दि :24 पु. ल. देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्यावतीने भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आपला बाप्पा… आपल्या हाताने घडवूया!’ या शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शहर व ग्रामीण भागातील ४१ शिबिरार्थींनी या कार्यशाळेत सहभाग घेत गणेशमूर्ती निर्मितीचे प्रशिक्षण घेतले.कोल्हापूरचे मूर्तिकार गौरव कांईगडे यांनी आपल्या सहकारी प्रथमेेश/शुभम कुंभार तसेच शुभदा कुंभार यांच्यासह शिबिरार्थींना गणेशमूर्ती निर्मितीबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित शिबिरार्थींना शाडू मातीचा वापर,मूर्ती घडविण्याची प्रक्रिया तसेच पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे महत्त्व याबाबत मुलांना प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली.
कार्यशाळेचे उद्घाटन गौरव कांईगडे व मंगला चौकाककर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. या कार्यशाळेच्या माध्यमातून बालकांमध्ये सर्जनशीलतेसोबतच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.विशेष म्हणजे मुलांचे पालक देखील उस्फूर्तपणे या कार्यशाळेत सहभागी झाले होते.संयोजकांच्या वतीने सर्व उपस्थित शिबिरार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले.
या कार्यशाळेचे आयोजन पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,मुंबई संचालिका मीनल जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.समन्वयक प्रशांत जोशी यांच्यासह राजेंद्र चौगुले,माधव बोरगावकर,पुष्कर बोरगावकर, कोमल भोसले,जयश्री देसाई यांनी या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular