पन्हाळा प्रतिनिधी (शहानवाज मुजावर):
‘द लायन्स ऑफ महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया’च्या वतीने पन्हाळा पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. पोलीस दल समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्यरत असते. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास पन्हाळा पोलीस ठाण्याचे मा. पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे तसेच पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी ‘द लायन्स ऑफ महाराष्ट्र’चे राष्ट्रीय अध्यक्ष बाजीराव पाटील सर, प्रदीप अध्यक्ष आग्नेल यांच्यासह फराह झांजी, रजिया आगा, मृणाल जगदाळे, मुमताज मुजावर, सुनीता उदाळे, नाजमीन गोलंदाज, अंजुम आगा, शाहीन मुजावर, शर्मिन मुजावर, निलोफर आगा आणि रजनी चरणकर आदी उपस्थित होते.
रक्षाबंधनाच्या माध्यमातून पोलीस आणि समाजातील नागरिकांमध्ये आपुलकी, विश्वास व बंधुभावाचे नाते अधिक दृढ व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांनी पोलीस दलाच्या सामाजिक बांधिलकीचे आणि सेवाभावी कार्याचे कौतुक केले.