चुये, दि. १४:
गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात मंगळवार दि. १५ पासून म्हणजेच आजपासून होत आहे. दरम्यान; अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येला सोमवार दि. १४ गोकुळ दूध संघाच्या माजी संचालकांनी चुये ता. करवीर येथे जाऊन गोकुळचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत श्री. आनंदराव पाटील- चुयेकर यांच्या समाधीला मनोभावे अभिवादन केले. समाधीला पुष्पहार अर्पण करून हे अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार राजेश पाटील, विश्वासराव पाटील- आबाजी, अरुणराव डोंगळे, नविद मुश्रीफ, अजित नरके, युवराज पाटील -बापू, रणजितसिंह पाटील, प्रा. किसन चौगुले, डॉ. सुजित मेणचेकर, करणसिंह गायकवाड, एस.आर. पाटील, नंदकुमार ढेंगे, अशोक फराकटे आदींसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

