कोल्हापूर, दि. 15 : केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा. अमित शहा हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, 19 सप्टेंबर रोजी सायं. 5.05 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. सायं. 5.10 वाजता शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सायं. 5.20 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन. सायं. 5.20 पासून राखीव. (स्थळ : शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर)
रविवार, 20 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह येथून हुपरीकडे प्रयाण. सकाळी 11.25 वाजता कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखाना, हुपरी येथे आगमन. सकाळी 11.30 ते 1 वाजता महालक्ष्मी ग्रीन एनर्जी कॉम्प्लेक्सचे भूमीपूजन आणि शेतकरी जनसभेसाठी राखीव. (स्थळ: कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखाना, हुपरी) दुपारी 1 ते 1.30 वाजता राखीव. (स्थळ: कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखाना, हुपरी) दुपारी 1.35 वाजता कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखाना, हुपरी येथून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 1.55 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. दुपारी 4 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.