Saturday, October 10, 2026
HomePoliticalगोकुळ निवडणुकीसाठी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा उद्या प्रचार शुभारंभ

गोकुळ निवडणुकीसाठी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा उद्या प्रचार शुभारंभ

चुये, ता. करवीर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी चुये (ता. करवीर) येथे होणार आहे. विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या पटांगणात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार बजरंग देसाई, सत्यजित पाटील सरुडकर, राजूबाबा आवळे, ऋतुराज पाटील, गणपतराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे आणि सुनील शिंत्रे यांच्यासह विविध राजकीय क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तसेच गोकुळचे माजी संचालक, विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय गटांकडून हालचालींना वेग आला असून, या प्रचार शुभारंभाच्या माध्यमातून राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कार्यक्रमाचा तपशील

  • दिनांक : रविवार, ११ ऑक्टोबर २०२६

  • वेळ : सकाळी ११ वाजता

  • स्थळ : विठ्ठल-रखुमाई मंदिराचे पटांगण, चुये, ता. करवीर, जि. कोल्हापूर

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular