कळे : महाराष्ट्र राज्य भूजल मत्स्यव्यवसाय सहकारी संघ, मर्यादित, अकोला यांच्या संचालकपदी कळे येथील राजेंद्र नलवडे यांची निवड झाली आहे. पुणे विभागीय पश्चिम महाराष्ट्र विभागातून त्यांची एकमेव निवड करण्यात आली आहे. राजेंद्र नलवडे हे दी भोईराज फिशरीज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, कोल्हापूरचे संचालक आहेत. या निवडीसाठी त्यांना दी भोईराज को-ऑपरेटिव्ह संस्थेचे सर्व संचालक तसेच सुनील काटकर, नामदेव तिकोने, सुनील घाग आणि जी. बी. भोई यांचे सहकार्य लाभले. या निवडीमुळे कळे परिसरातील सहकार व मत्स्यव्यवसाय क्षेत्रात कार्यरत असलेल्या राजेंद्र नलवडे यांच्या कामाची राज्यस्तरावर दखल घेतली गेली आहे.