कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदी शशिकांत पाटील चुयेकर याची झालेली निवड प्रकरण आता उच्च न्यायालयात गेले आहे. आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडी न्यायालयात गेली असून चुयेकर यांची निवड ही नियमाला धरून आहे या निवडीसाठी सदस्य संख्यांचा कोरम असण्याची गरज नाही. आज दुपारीच न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. विरोधी महायुती आता काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. विरोधी गटाकडून चार स्विकृत सदस्य घेउन आपला अध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरू आहेत.त्यास परवानगी देउ नये. बहूमताच्या जोरावर चुयेकरांची झालेली निवड ग्राहय मानावी अशी मागणी ही याचिकेत केली आहे.