मुदाळतिट्टा/प्रा.शिवाजी खतकर:
सात दिवसात पाऊस, साखर मिरची महाग ते राजकीय उलथापालथ, पट्टणकोडोलीच्या यात्रेत फरांडे बाबांची भाकणूक, हजारो भाविकांनी घेतलं दर्शन
फरांडे बाबांनी काय केली भाकणूक?
कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोलीच्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेचा आजचा शेवटचा दिवस या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक दरवर्षी येतात. यावर्षी देखील मोठ्या प्रमामात भाविक पट्टणकोडोलीत दाखल झाले आहेत. दरम्यान, या यात्रेत फरांडे बाबा भाकणूक करतात. ही भाकणूक एकण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी या यात्रेत होत असते. फरांडे बाबांनी केलेल्या भाकनुकीनुसार, पुढच्या सात दिवसात पाऊस पडेल, राजकीय उलथापालथ होऊन देशावर महिला राज येईल. मिरची आणि साखरेचे दर वाढतील, इतकंच नाही तर मोठी आंदोलनं होऊन लढाया होतील अशी भाकणुक फरांडे बाबा यांनी केली आहे.
29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत येथील यात्रा उत्साहात पार पडली.
पट्टणकोडोली येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल-बिरदेव यात्रा 2026 ही तीन दिवस चाली आहे. 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत येथील यात्रा उत्साहात पार पडली आहे. या यात्रेसाठी मोठ्या संख्येनं भाविक पट्टणकोडोलीत झाले आहेत. आज हजारो भाविकांनी विठ्ठल बिरुदेवाचे दर्शन घेऊन भंडाऱ्याची उधळण केल्याचं पाहायला मिळाल. विशेष म्हणजे दरवर्षी या यात्रेत फरांडे बाबा भाकणूक करत असतात. त्यांच्या भाकणूकीकडे सर्वाचं लक्ष लागलेलं असतं. यावर्षी देखील त्यांनी भाकणूक केली आहे. यामध्ये पुढच्या सात दिवसात पाऊस पडेल असे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर राजकीय उलथापालथ होऊन देशावर महिला राज येईल अशी भावकूम देखील फरांडे बाबांनी केली आहे. तसेच मिरची आणि साखरेचे दरात मोठ्या प्रमाणात वाढ होईल अशी भाकणूक फरांडे बाबांनी पट्टणकोडोलीत यात्रेत केली आहे. त्याचबरोबर मोठी आंदोलनं होऊन लढाया होतील असं ही त्यांनी सांगितलं आहे.