बहिरेश्वर प्रतिनिधी…
करवीर तालुक्यातील मौजे बहिरेश्वर येथील जिल्हा परिषदेच्या वि मं बहिरेश्वर प्राथमिक शाळेत (IDEL LEARNING CENTER) आधुनिक संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक व बहिरेश्वर गावचे सुपुत्र शरदजी गोसावी यांचे शुभहस्ते नुकतेच करण्यात आले..
सन्माननीय शरदजी गोसावी यांचे मुळ गाव बहिरेश्वर असलेमुळे त्यांच्या स्वागतासाठी ग्रामपंचायत प्रशासन व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती.हलगी, लेझीम फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांची मिरवणूक काढण्यात आली व मान्यवरांच्या हस्ते भव्य दिव्य स्वागत करण्यात आले..
कार्यक्रमाच्या सुरवातीला दिपप्रज्वलन व सरस्वती फोटो पुजनानंतर डिजीटल संगणक कक्षाचे उद्घाटन शरदजी गोसावी , सरपंच सौ वंदना दिंडे,बहिरेश्वर पंचायत समिती सदस्या लता दिंडे तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सौ वंदना दिंडे होत्या.
तद्नंतर वि मं बहिरेश्वर शाळेस तब्बल 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समस्त बहिरेश्वर वासियांच्या वतीने शरदजी गोसावी यांचा भव्य दिव्य सत्कार करण्यात आला.. यावेळी शरदजी गोसावी यांनी या सत्काराने समाधान व्यक्त करत या आपल्या माणसांनी केलेल्या सत्काराने भारावून गेल्याचे नमुद केले…तसेच अजून शाळेसाठी अतिरिक्त 150 बेंच देत असलेचे जाहीर केले. तसेच शाळेसाठी आवश्यक भौतिक सेवासुविधा कामांची मागणी करावी असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व सरपंच यांना केले..
मुख्याध्यापक बाजारी सर यांनी आपल्या मनोगतात शाळेतील भौतिक सुविधा, पटसंख्या,शिक्षक संख्या,शाळेची शैक्षणिक गुणवत्ता , आमदार चंद्रदीप नरके यांच्या फंडातून चालु असणारी बांधकामे याची सविस्तर माहिती दिली.
प्राध्यापक तानाजी गोधडे सर, पंढरीनाथ काशिद सर, डॉ सुर्यकांत मोरे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.
शरद गोसावी यांनी आपल्या मनोगतात आपली शैक्षणिक कारकीर्दीची माहिती दिली..बहिरेश्वर येथील न्यू इंग्लिश स्कूल बहिरेश्वर शाळेत ज्ञानदानाचे काम करत असतानाच MPSC मधून शिक्षणाधिकारी पदावर रूजू झाल्याचे सांगितले.त्यावेळी गावाने केलेला सत्कार आणि मानसन्मान माझ्यासाठी बहुमोल होता ..या गावाच्या ऋणातुन उतराई होण्यासाठी हा केलेला छोटासा प्रयत्न असलेच याप्रसंगी त्यांनी सांगितले…आपली गावाशी जोडलेली नाळ,मातीशी असलेलं नात जपण्यासाठी आपण या डिजिटल संगणक कक्षाची उभारणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.. आपल्या खेड्यातील विद्यार्थी भविष्यात डिजिटल युगात मागे राहिला नसला पाहिजे तो गुणवंत तसेच संगणक क्षेत्रात अग्रेसर होण्यासाठी त्याला प्राथमिक शाळेत संगणकीय शिक्षण मिळावे या उद्देशाने ही संगणक शाळा उभारण्यात आली असलेच यावेळी सांगण्यात आले..
शासनाच्या उपक्रमातून राज्यभरात जवळपास 1500 शाळा निवडण्यात येणार आहेत या उपक्रमांतर्गत आपण माझ्या गावातील प्राथमिक शाळेला प्राधान्य देत आज ही संगणक प्रयोगशाळा उभारली असलेच यावेळी गोसावी यांनी सांगितले.यासाठी भगवान दिंडे,पंढरी काशिद सर,माजी सैनिक निवृत्ती दिंडे, अनिल बचाटे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश बचाटे,प्रा तानाजी गोदडे यांनी मागणी केल्यामुळे आपण शासनस्तरावर याचा पाठपुरावा करून प्राधान्याने वि मं बहिरेश्वर शाळेसाठी हा निधी उपलब्ध करून दिला आहे.
अजूनही काही निधी लागत असल्यास शासन स्तरावर तात्काळ दखल घेऊन पुर्तता करू पण शाळेची गुणवत्ता वाढली पाहिजे शाळेचा पट वाढला पाहिजे यासाठी शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती,पालक व ग्रामस्थ यांचा पुढाकार असला पाहिजे असे अश्वस्त केले..
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, करवीर पंचायत समिती विस्तार अधिकारी आंग्रे,माजी सरपंच पी आर पाटील,माजी सरपंच सुर्यकांत दिंडे, भगवान दिंडे,माजी सरपंच युवराज दिंडे,उपसरपंच कृष्णात दिंडे, माजी सैनिक निवृत्ती दिंडे,जयवंत हावलदार, ग्रामपंचायत सदस्य,सदस्या,शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जगताप मॅडम यांनी केले तर प्रस्तावना लेखक, कवी अनिल बचाटे सर यांनी केली.आभार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश बचाटे यांनी मानले.