बहिरेश्वर प्रतिनिधी:
बहिरेश्वर ता करवीर येथे रविवार दि 1.11.2026 रोजी 37 वर्षीय रूपेश बाळासो चौगले पाटील या युवकाचे विजेच्या तीव्र धक्क्याने अपघाती निधन झाले..या घटनेने संपूर्ण गावातुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार रुपेश चौगले यांचे जनावरांचे शेड माळवाडी येथे आहे.सकाळी 7.30च्या दरम्यान रूपेश जनावरांना धुण्यासाठी गोठ्यावर गेला होता..त्यांने जनावरांना धुण्यासाठी सर्व्हिसींग मोटर चालू केली त्यावेळी त्या मशिन मधून त्याला विजेचा जोराचा झटका बसला व तो जागीच कोसळला.. रुपेशकडे वायररोप आणण्यासाठी गेलेल्या त्याच्या मित्राला ही घटना निदर्शनास आल्यावर त्यांने तात्काळ वीजपुरवठा खंडित केला व रूपेशला शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच डाॅक्टरांनी मयत घोषित केले …..शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.दुपारी 12 च्या सुमारास शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले..याच्या पश्चात पत्नी तीन मूले,आई वडील भाऊ बहिण असा परिवार आहे..सदर घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे…