Tuesday, November 10, 2026
HomeSocialसाबळेवाडीत माणुसकीचा आदर्श! दुर्गंधीमुळे ग्रामस्थ त्रस्त; तरुणांनी पुढाकार घेत मृत गायीची केली...

साबळेवाडीत माणुसकीचा आदर्श! दुर्गंधीमुळे ग्रामस्थ त्रस्त; तरुणांनी पुढाकार घेत मृत गायीची केली योग्य विल्हेवाट

दोनवडे प्रतिनिधी : साबळेवाडी गावच्या हद्दीतील ओढ्याशेजारी अज्ञात व्यक्तीने सोमवारी मध्यरात्री मृत गायी टाकून दिल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.

ही बाब लक्षात येताच गावातील श्रीधर वरपे, प्रथमेश साबळे आणि योगेश पडवळे या तरुणांनी तत्काळ पुढाकार घेतला. ग्रामपंचायतीच्या संबंधित कर्मचाऱ्यांना बोलावून घेत श्रीधर वरपे यांनी स्वतःचा जेसीबी घटनास्थळी आणला. त्यानंतर स्वतःच्या शेतात योग्य जागी खड्डा खोदून त्यामध्ये माती व मीठ टाकून मृत गायीची व्यवस्थित विल्हेवाट लावण्यात आली.या कामात विलास गुंडा पाटील आणि अशोक पाटील यांनीही मोलाचे सहकार्य केले.

सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच ग्रामस्थांनी दाखवलेली तत्परता आणि सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद ठरत आहे. गावाच्या स्वच्छतेसाठी आणि सामाजिक जबाबदारीसाठी पुढाकार घेणाऱ्या या युवकांचे परिसरातून कौतुक होत आहे.

संकटाच्या वेळी प्रशासनाची वाट न पाहता सामाजिक जबाबदारी स्वीकारणाऱ्या साबळेवाडीतील ग्रामस्थांनी माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे!

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular