Sunday, November 15, 2026
HomePoliticalचंद्रकांतदादानी आ. बंटी पाटलांच्या विरुद्ध शड्डू ठोकलाच, गोकुळचं राजकारण पेटलंय..!

चंद्रकांतदादानी आ. बंटी पाटलांच्या विरुद्ध शड्डू ठोकलाच, गोकुळचं राजकारण पेटलंय..!

कोल्हापूर :गोकुळमध्ये बहूमत असूनही आ. सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला महाविकास आघाडीने हरवलं. आ. सतेज यांच्या नाकावर टिच्चून महाविकास आघाडीचा अध्यक्ष केला. इथे पर्यंत राजकारणात दोन्ही गटात जुंपली होती पण खरं राजकारण पेटलं ते या निवडीवेळी झालेल्या सभेत. मंत्री चंद्रकांत दादा व मंत्री हसन मुश्रीफ यांनी आ. सतेज पाटील यांच्यावर थेट तोफ डागल्यानेच. या वेळी चंद्रकांत दादानी तर स्व.डॉ. डी वाय पाटील हे पूर्वीच्या काळी स्कूटरवरून फिरत होते, त्यांच्याकडे एवढी संपत्ती आली कोठूंन असा आरोप करीत डिवचले तर पुढे मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारलं तर सतेज पाटलांचे साम्राज्य  उध्वस्त करण्याची धमकी दिली. त्यामुळे सतेज पाटील आणि त्यांचे पाठराखे फारच संतप्त झालेत. त्या नंतर आ. सतेज पाटील यांनी सरकारी यंत्रणेचा वापर करून गोकुळची सत्ता मिळवलीत हिंमत असेल तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेऊन मैदानात या असे थेट आव्हान दिले. यावर एका वृत्त वाहिनीशी बोलताना मंत्री चंद्रकांत दादा यांनी सतेज पाटलांचे आव्हान स्विकारत कोल्हापूरमधील कोणत्याही मतदारसंघात लढण्याची तयारी दाखवली आहे. विधानसभा निवडणुकीला अद्याप वेळ आहे पण मंत्री चंद्रकांत दादा विरुद्ध आ. सतेज पाटील यांच्यातील सामन्याची घोषणा झाली आहे. गोकुळचे हे राजकारण विधानसभे पर्यंत पोहचले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात दादा विरुद्ध बंटी पाटील सामना होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular