Monday, November 23, 2026
HomeCrimeकोल्हापुरात हिट अँड रन, गोकुळचे माजी संचालक रणजितसिंह पाटील यांच्या मुलाच्या कारची...

कोल्हापुरात हिट अँड रन, गोकुळचे माजी संचालक रणजितसिंह पाटील यांच्या मुलाच्या कारची दोघांना धडक..

कोल्हापूर :शहरात मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघातात दोन सख्ख्या चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला. शिवाजी विद्यापीठ परिसरात हा अपघात घडला असून, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक रणजितसिंह पाटील यांचे पुत्र पद्मसिंह पाटील यांच्या वाहनाने दोघांना जोरदार धडक दिल्याची माहिती समोर आली आहे.

उमेश पाथरूड आणि गणेश पाथरूड हे दोघे शिवाजी विद्यापीठाजवळून जात असताना त्यांना पद्मसिंह पाटील यांच्या वाहनाची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अपघातानंतर राजारामपुरी पोलीस ठाण्यात पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. अपघाताच्या वेळी वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत होता का, याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय नमुने घेण्यात आले आहेत. वैद्यकीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मद्यप्राशन करून वाहन चालवल्याचे निष्पन्न झाल्यास त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या अपघातामुळे शहरातील वाहनचालकांच्या बेदरकारपणाचा आणि रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दोन तरुणांचे जीव गेल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजारामपुरी पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular