Friday, April 3, 2026
HomePoliticalकोल्हापूर जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड

कोल्हापूर जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड

कोल्हापूर:

जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदांच्या निवडी सोमवारी अपेक्षेप्रमाणे बिनविरोध पार पडल्या. या निवडीत विविध पक्षांच्या उमेदवारांची एकमताने निवड करण्यात आली.

बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापतीपदी सारिका यशवंत नांदेकर (शिंदेसेना) यांची निवड झाली. शिक्षण व अर्थ समितीच्या सभापतीपदी शीतल प्रविण यादव (जनसुराज्य) यांची निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी विद्या विलास पाटील (राष्ट्रवादी अजित पवार पक्ष) यांची निवड झाली, तर समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी श्रद्धा गायकवाड (यड्रावकर यांची शाहू आघाडी) यांची निवड करण्यात आली.

महाविकास आघाडीने या चारही सभापतीपदांसाठी भरलेले अर्ज मागे घेतल्याने निवड प्रक्रिया बिनविरोध झाली. राष्ट्रवादीचे गटनेते सुधीर देसाई यांच्या विनंतीनुसार तसेच आमदार सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार हे अर्ज मागे घेण्यात आले आणि निवडीवर शिक्कामोर्तब झाले.

निवड सभेचे पीठासन अधिकारी म्हणून करवीर प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांनी काम पाहिले. यावेळी करवीर तहसिलदार स्वप्निल पवार, जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव तसेच ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular