Friday, April 3, 2026
HomePoliticalअर्थ व शिक्षण समिती सभापती सौ. शितल प्रविण यादव यांचा जिल्हा परिषद...

अर्थ व शिक्षण समिती सभापती सौ. शितल प्रविण यादव यांचा जिल्हा परिषद कार्यालयात दिमाखात प्रवेश…

.

बहिरेश्वर प्रतिनिधी: 
जिल्हा परिषदमध्ये महायुती घटकपक्ष जनसूराज्य पक्षाच्या नुतन अर्थ व शिक्षण समिती सभापती सौ शितल प्रविण यादव यांनी आज आमदार अशोकराव माने,नुतन जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, महिला बालकल्याण समिती सभापती विद्या विलास पाटील व बांधकाम समिती सभापती सौ सारिका नांदेकर तसेच आजी, माजी जिल्हा परिषद सदस्य मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, शिक्षणाधिकारी सौ मीना शेंडकर ,सौ हजबे मॅडम ,समित कदम,वारणा समुहाचे पदाधिकारी व मान्य वरांच्या उपस्थितीत कार्यालय प्रवेश केला… जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्रशासनाने नूतन सभापती च्या स्वागतासाठी भव्य सजावट,हालगी आणि चहापान चे नेटके नियोजन केले होते…कार्यालय प्रवेशानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते शिक्षण व अर्थ समिती सभापती यांचे पूष्पगुच्छ,श्रीफळ फेटा देऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या….यावेळी शिक्षण विभाग तसेच वित्त, बांधकाम, कृषी आरोग्य अधिकारी ,कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular