Friday, May 15, 2026
HomeEconomyदेशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ; महाराष्ट्रातही इंधन दरांचा भडका

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ; महाराष्ट्रातही इंधन दरांचा भडका

मुंबई:

देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ जाहीर केली आहे. एप्रिल 2022 नंतर प्रथमच इंधन दरवाढ करण्यात आली असून पेट्रोल प्रतिलिटर 3 रुपयांनी, तर डिझेल प्रतिलिटर 3.11 रुपयांनी महागले आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार असून महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिल्लीमध्ये नियमित पेट्रोलचा दर 94.77 रुपयांवरून 97.77 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेलचा दर 87.67 रुपयांवरून 90.67 रुपये प्रति लिटरपर्यंत वाढला आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर 106.58 रुपये, तर डिझेलचा दर 93.08 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करण्याचा सल्ला दिल्यानंतर इंधन दरवाढीबाबतची चर्चा सुरू झाली होती. अखेर तेल कंपन्यांच्या निर्णयामुळे देशभरात इंधनाचे दर वाढले असून वाहतूक, शेती आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील नवे पेट्रोल-डिझेल दर

जिल्हा

पेट्रोल (प्रति लिटर)

डिझेल (प्रति लिटर)

मुंबई

₹106.58

₹93.08

ठाणे

₹106.84

₹93.44

पुणे

₹106.82

₹93.46

पालघर

₹107.21

₹93.68

भंडारा

₹107.79

₹94.30

सोलापूर

₹107.19

₹93.71

नाशिक

₹107.93

₹94.41

परभणी

₹108.63

₹95.13

सांगली

₹107.16

₹93.71

नागपूर

₹107.13

₹93.67

छत्रपती संभाजीनगर

₹106.34

₹95.64

कोल्हापूर

₹107.49

₹94.15

रत्नागिरी

₹108.35

₹94.92

अमरावती

₹108.14

₹94.78

बुलढाणा

₹107.21

₹95.23

हिंगोली

₹108.55

₹91.92

रायगड

₹108.23

₹94.67

धुळे

₹108.12

₹95.20

अहिल्यानगर

₹107.80

₹93.60

उल्हासनगर

₹104.37

₹90.86

गोंदिया

₹108.63

₹94.34

जालना

₹108.50

₹95.17

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम भाजीपाला, धान्य, दूध तसेच अन्य वस्तूंच्या किमतींवर होऊ शकतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular