Saturday, May 30, 2026
HomePoliticalगोकुळ निवडणुकीसाठी महायुतीच्या आघाडीची आ. विनय कोरेंनी, मंत्री मुश्रीफ ,अबिटकर. चंद्रकांत दादा,महाडिकांच्या...

गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीच्या आघाडीची आ. विनय कोरेंनी, मंत्री मुश्रीफ ,अबिटकर. चंद्रकांत दादा,महाडिकांच्या उपस्थितीत केली घोषणा

कोल्हापूर:

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीची छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी आज जाहीर झाली. कोल्हापुरात रेसिडेन्सी क्लबमध्ये दुपारी तीनच्या सुमाराला महायुतीच्या प्रमुख नेतेमंडळींची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. विनय कोरे-सावकार, आमदार अमल महाडिक, जनसुराज युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष समिती कदम आदी प्रमुख उपस्थित होते.

यासंदर्भात बोलताना आमदार डॉ. विनय कोरे- सावकार म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हा सर्वांना महायुतीची बैठक घेण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार निवडणूक नियोजनाच्या अनुषंगाने आम्हा सर्व नेतेमंडळांची एकसंघपणे अतिशय चांगली चर्चा झाली. महायुती म्हणून आम्ही सगळे एकसंघपणे गेल्यानंतर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगली चित्र निर्माण होणार आहे. मधल्या काळात आमच्यातीलच काही कार्यकर्त्यांच्या दुखावलेल्या भावना या सगळ्याचे प्रतिबिंब थोड्याफार प्रमाणात उमटलेही होते. त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या निवडणुकीत महायुती एकत्र येणार की नाही? अशा पद्धतीचे थोडसं वेगळं वातावरण निर्माण झाले होते. आज या सगळ्या विषय आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. या निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून एकसंघपणे सामोरे जाणार आहोत.
======

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular