कोल्हापूर:
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प करवीर-२ अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र महिलांनी मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी नयना पाटील यांनी केले आहे. या भरतीअंतर्गत एक सेविका व १२ मदतनीस पदे भरण्यात येणार आहेत. १ ते १२ जून या कालावधीत कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारण्यात येणार असून, अर्ज संबंधित ग्रामपंचायत कार्यालय तसेच प्रकल्प कार्यालयात उपलब्ध आहेत. या पदांसाठी किमान बारावी उत्तीर्ण महिला उमेदवार पात्र राहणार आहेत. आरे पैकी धनगरवाडी येथे अंगणवाडी सेविका पदासाठी एक जागा उपलब्ध असून, या पदासाठी केवळ धनगरवाडी महसूल गावातील पात्र महिला उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे. *महे, गाडेगोंडवाडी, आपटी, खाटांगळे, बोलोली, कुडीत्रे, वडणगे आणि आंबेवाडी* येथे प्रत्येकी एक मदतनीस पद भरले जाणार आहे. केर्ली येथे मदतनीसांच्या तीन जागा उपलब्ध आहेत. ही पद भरती शासन निर्णय ३० जानेवारी २०२५ नुसार पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार असून, उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला अथवा भूलथापांना बळी बडू नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.