कोल्हापूर प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सायबर कॉलेज, कोल्हापूर अंतर्गत असणाऱ्या CNCVCW पर्यावरण विभाग आणि भारत सरकारच्या युवा कार्यक्रम एवं क्रीडा मंत्रालयांतर्गत कार्यरत “माय भारत, कोल्हापूर” यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर कॅम्पसमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कॅम्पसमध्ये वृक्ष लागवड करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. एम. एस. देशमुख, सायबर पर्यावरण कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ. आर. जी. कुलकर्णी, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह हेड प्रा. डॉ. विनायक साळोखे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी MSW विभागाचे प्रा. डॉ. उमाकांत वळवी, प्रा. डॉ. प्रज्ञा कापडी, इंटेरियर डिझाईन विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रीती गरगटे, IT Cell प्रमुख प्रा. मंतेश पाटील (नूल), लेखा विभाग प्रमुख श्री. विकास पाटील, प्रा. डॉ. विनायक कदम, “माय भारत कोल्हापूर”चे कु. गणेश भोसले, कु. नीलेश कांबळे, युथ क्लब प्रेसिडेंट कु. पार्थ सिंघन तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमासाठी सायबर ट्रस्टचे अध्यक्ष मा. सीए रणजितसिंह शिंदे आणि सचिव मा. सीए ऋषिकेश शिंदे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांनी अधिकाधिक वृक्ष लागवडीचा संकल्प केला.