कोल्हापूर/दोनवडे : श्रीकांत पाटील
कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणजे गोकुळ म्हणजेच (कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ). गोकुळ वर आपलंच वर्चस्व पाहिजे यासाठी मुंबई पर्यंत स्पर्धा सुरू झाली आहे आजपर्यंत गोकुळात कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला नाही आता सरळ घोडेबाजार सुरू झाला आहे गोकुळ म्हणजे सोन्याचं अंडकोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मातब्बर यांना गोकुळात आम्ही पाहिजे ही अपेक्षा असते. शेतकऱ्यांच्या थालिपीठावर किती दिवस रांगोळ्या मांडणार हा प्रश्नच आहे.आता तर हद्द सोडलीमाझ्या मुलग्याला नोकरीत घ्या.आमच्या संस्थेचे बांधकाम अपुरे आहे मला ठराव द्या अशी मागणी सुरू झाली आहे आता तर पाच नव्हे दहा लाखापर्यंत बोलणी सुरू आहे आणि हे रियल (सत्य) आहे
सद्यस्थितीत गोकुळची निवडणूक दूध संघापुरती मर्यादित राहिलेली नाही, ती जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाची ठरणार आहे. गोकुळचे रणांगण राज्यातील प्रमुख राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे..
जिल्ह्याचे नेते महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील आणि अरुण नरके यांचे गोकुळवर अनेक वर्षे वर्चस्व होते; गोकुळला मल्टिस्टेट करण्याचा प्रस्ताव पुढे आल्यानंतर या विषयावरून मोठे राजकीय वादळ निर्माण झाले. आमदार सतेज पाटील यांनी या प्रस्तावाविरोधात जनमत तयार केले.
गोकुळमध्ये महायुती अभेद्य ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे मंत्री हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके आणि संजय मंडलिक यांना महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढवण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत त्यामुळे महायुतीचे नेते एकत्र आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सहभागी झाल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक नेते महायुतीच्या व्यासपीठावर आले. परिणामी, एकेकाळी गोकुळमध्ये एकत्र लढणारे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ आता परस्परविरोधी राजकीय बाजूंवर उभे ठाकले आहेत.
खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक अशा दिग्गजांची फौज महायुतीत आहे, तर आमदार सतेज पाटील यांनी गोकुळवरील सत्ता कायम राखण्यासाठी पक्षनिरपेक्ष राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीची मोट बांधली आहे. गोकुळच्या रणांगणात महायुती यशस्वी ठरणार की आमदार सतेज पाटील यांचा करिष्मा वरचढ ठरणार याकडे संपूर्ण जिल्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.