Saturday, July 25, 2026
HomeCrimeबनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी नोकरीचे आमिष; तिघांविरुद्ध कळे पोलिसांत ४८ लाखांच्या फसवणुकीचा...

बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी नोकरीचे आमिष; तिघांविरुद्ध कळे पोलिसांत ४८ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा

कळे: बनावट शासकीय शिक्के, कागदपत्रे व बोगस सह्या तयार करून सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत सुमारे ४८ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध कळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बबन बाबुराव कुंभार (वय ५०, रा. वारनुळ, ता. पन्हाळा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमृतराव किसन काळोखे (रा. राजापूर, ता. खटाव, जि. सातारा), सुरेश शामराव देसाई (रा. करजवाडे, ता. वाळवा, जि. सांगली) आणि शिवाजी भाऊसाहेब मोहिते (रा. गणेश कॉलनी, थेरगाव, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट २०२४ ते २० मे २०२६ या कालावधीत आरोपींनी सरकारी नोकरीचे आमिष दाखवले. सातारा आरोग्यसेवक पदासाठी १५ लाख रुपये आणि रेल्वेतील नोकरीसाठी २० लाख रुपये अशी रक्कम मागणी केली. विविध बँक खात्यांद्वारे आरटीजीएसने ३९ लाख २५ हजार रुपये तसेच रोख ९ लाख रुपये घेण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपींनी रेल्वे व आरोग्य विभागाचे बनावट शासकीय शिक्के, बोगस सह्या करून
शुभम भगवान कुंभार, महेश भगवान कुंभार, सुरज राजाराम कुंभार आणि प्रदीप राजाभाऊ भामटेकर यांची
बनावट नियुक्तीपत्रे तयार करून ती खरी असल्याचे भासवून फिर्यादी व इतरांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पुढील तपास सपोनि दीपक कदम करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular