कोल्हापूर, दि. 2 : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.32 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सायंकाळी 4 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्र.6 हा खुला असून सध्या धरणातून स्वयंचलित व्दारामधून 1428 व पावर हाऊसमधून 1400 असा एकूण 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.*
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, कासारी नदीवरील- यवलूज व ठाणे आळवे, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, खडक कोगे, हळदी, राशिवडे व तारळे कुंभी नदीवरील- सांगरुळ व कळे दूधगंगा नदीवरील- दत्तवाड व सुळकूड, वारणा नदीवरील – चिंचोली, माणगाव, कोडोली, खोची, दानोळी व शिगाव वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे व चिखली हिरण्यकेशी नदीवरील- निलजी, तुळशी नदीवरील- कसबा बीड व ताम्रपर्णी नदीवरील चंदगड व कुर्तनवाडी असे एकूण 33 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा (कंसात एकूण टक्केवारी )- राधानगरी 8.32 (99.51 टक्के), तुळशी 3.08 (88.67 टक्के), वारणा 29.76 (86.52 टक्के), दूधगंगा 17.97 (70.78 टक्के), कासारी 2.35 (84.60 टक्के), कडवी 2.52 (100 टक्के), कुंभी 2.52 (81.70 टक्के), पाटगाव 2.75 (73.93 टक्के), चिकोत्रा 0.91 (59.85 टक्के), चित्री 1.89 (100 टक्के), जंगमहट्टी 1.22 (100 टक्के), घटप्रभा 1.56 (100 टक्के), जांबरे 0.82 (100 टक्के), आंबेआहोळ 1.19 (96.33 टक्के), सर्फनाला 0.67 (100 टक्के), धामणी 1.29 (100 टक्के) टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 32.11, सुर्वे 32.00, रुई 62.2, इचलकरंजी 59.3, तेरवाड 54.3 शिरोळ 51.28 , नृसिंहवाडी 50.00 फूट इतकी पाणीपातळी आहे.