कोल्हापूर : उच्च न्यायालयाने अवसायनातील ४९२ दूध संस्था तसेच कार्यक्षेत्राबाहेरील ठरावधारक म्हणून तक्रार झालेल्या १७५ दूध संस्थांच्या मतदान पात्रतेबाबत निकाल दिल्याने गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे एकूण ६६७ दूध संस्थांच्या मतदानाच्या पात्रतेचा प्रश्न निकाली निघाला आहे.
दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रचारासाठी गडहिंग्लज दौऱ्यावर असलेल्या सत्ताधारी संचालक मंडळातील नेत्यांनी या निकालाबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील (आबाजी), माजी अध्यक्ष नविद मुश्रीफ, संचालक युवराज पाटील (बापू), अजित नरके, डॉ. सुजित मिणचेकर, नंदकुमार ढेंगे, बाळासाहेब खाडे, रणजितसिंह पाटील, किसन चौगले, अमरसिंह पाटील, एस. आर. पाटील यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश पाटील-गिजवणेकर, राहुल शिरकोळी, विजय दाभाडे आणि शिवराज पाटील उपस्थित होते.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर गोकुळच्या आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.