Friday, October 9, 2026
HomePoliticalशिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपाची जोरदार तयारी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण...

शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपाची जोरदार तयारी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत निवडणूक रणनीतीवर चर्चा

सातारा : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हा कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक तयारी, कार्यकर्त्यांची भूमिका, मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी करावयाचे नियोजन आणि आगामी काळातील कार्यदिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

युवकांना सक्षम करून त्यांच्या प्रगतीसाठी नव्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच शिक्षक व पदवीधरांच्या विविध प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करणे, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना अधिक बळकट करणे आणि शिक्षक व पदवीधर मतदारांशी प्रभावी संवाद साधणे, या दृष्टीनेही मार्गदर्शन करण्यात आले.

या बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, मंत्री मा. श्री. जयकुमार गोरे, मंत्री मा. श्री. शिवेंद्रराजे भोसले, राज्यमंत्री मा. श्रीमती माधुरीताई मिसाळ, भाजपा प्रदेश सरचिटणीस श्री. राजेश पांडे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार श्री. निरंजन डावखरे, श्री. धैर्यशील कदम, श्रीमती प्रियाताई शिंदे, पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील उमेदवार म्हणून शिक्षकांच्या समस्या, त्यांच्या न्याय्य मागण्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार शिक्षक मित्र श्री. कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केला आहे.
शिक्षकांच्या सेवा-सुरक्षेचे प्रश्न, शैक्षणिक धोरणांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती, आवश्यक विशेष शिक्षकांची नियुक्ती, तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर प्रभावी पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. शिक्षकांचे प्रश्न केवळ मांडण्यापुरते मर्यादित न ठेवता त्यावर ठोस उपाययोजना व्हाव्यात, यासाठी शासन आणि संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यावर त्यांचा भर आहे.
शिक्षक व पदवीधरांच्या अपेक्षा समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांना सक्षम व्यासपीठ मिळवून देणे, शिक्षण क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी विधायक भूमिका घेणे आणि शिक्षकांचा आवाज प्रभावीपणे विधान परिषदेत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे, हा आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या कार्याचा प्रमुख केंद्रबिंदू राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular