बहिरेश्वर प्रतिनिधी…..
शासनाने डिजीटल इंडियाचा नारा देऊन सर्व व्यवहार डिजीटल करण्याचा घाट घातला आहे परंतू सर्वसामान्य जनतेला डिजीटल अरेस्ट,डिजीटल फ्राॅड सायबर गून्हेगारांकडून नवनवे फंडे वापरून गंडा घातला जात आहे..आता तर आर टी ओ mparivahan च्या नावाखाली बोगस लिंक पाठवुन वाहनचालकांना गंडा घातला जात आहे ..वाहन धारकही कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता आलेल्या m परिवहन लिंकला न झालेला दंड चलन स्वरूपात भरत आहेत..वाहतूक पोलीस ही अशा प्रकारच्या लिंक पाहुन आश्चर्य व्यक्त करत आहेत..पोलीसांनी केलेला दंड भरला जात नाही आणि अशा बोगस चलनाला वाहनचालक बळी पडत आहेत हे दूर्देव म्हणावे लागेल.अशा प्रकारची एखादी बोगस लिंक आल्यास संबंधित ट्रॅफिक पोलीसांकडून आलेल्या लिंकची खातरजमा करावी खात्री करूनच चलन भरावे असे आवाहन वाहतूक पोलीस प्रशासनाने केले आहे…