Friday, October 16, 2026
HomeCrimeकळेत विद्युत तार तुटून दीड एकर ऊस जळाला ठिणग्यांमुळे आग; शेतकऱ्यांचे...

कळेत विद्युत तार तुटून दीड एकर ऊस जळाला ठिणग्यांमुळे आग; शेतकऱ्यांचे अडीच लाखांचे नुकसान

कळे : येथे महावितरणची उच्च विद्युतदाबाची तार तुटून पडल्याने उडालेल्या ठिणग्यांमुळे दीड एकरातील ऊस जळून खाक झाला. शुक्रवारी (दि. १६) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. नागरिकांनी वेळीच धाव घेऊन आग विझवल्याने पुढील नुकसान टळले.

हरिजनवाडामार्गे नदीकडे जाणाऱ्या मार्गावर महावितरणच्या सावर्डे फिडरवरून शेतीपंपांसाठी ११ केव्ही उच्च विद्युतदाबाची वीजवाहिनी गेली आहे. या वाहिनीवरील विद्युतवाहक तार दुपारी अचानक तुटून पडली. त्यातून उडालेल्या ठिणग्यांमुळे खालील ऊसपिकाला आग लागली. आग लागल्याचे समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

या आगीत मेघराज पाटील, कविता पाटील, युवराज पाटील, शहाजी पाटील आणि जोतीराम बाबू पाटील यांच्या शेतातील सुमारे दीड एकर ऊस जळाला. या घटनेत अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular