Friday, November 20, 2026
HomePoliticalकसबा बावड्यातील रांगी ड्रेनच्या सफाईसाठी दरवर्षी दोन लाखांचा निधी द्या ;नगरसेवक सचिन...

कसबा बावड्यातील रांगी ड्रेनच्या सफाईसाठी दरवर्षी दोन लाखांचा निधी द्या ;नगरसेवक सचिन चौगले यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

कोल्हापूर : कसबा बावडा प्रभाग क्रमांक १ मधील रांगी ड्रेन नाल्याची नियमित सफाई करण्यासाठी दरवर्षी दोन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगरसेवक सचिन हरीश चौगले यांनी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे उपस्थित होते.

कसबा बावडा परिसरातील रांगी ड्रेन हा पावसाळी पाण्यासह नागरी वसाहतीतील पाण्याचा निचरा होण्यासाठी महत्त्वाचा मार्ग आहे. या नाल्याची लांबी सुमारे सहा हजार रनिंग फूट असून, दरवर्षी वेळेत सफाई न झाल्यास नाल्यात गाळ, गवत आणि झाडाझुडपांमुळे पाण्याचा प्रवाह अडतो. परिणामी पावसाळ्यात नाल्याचे पाणी शेतजमिनीत शिरून परिसरातील सुमारे ४०० ते ५०० एकर शेती बाधित होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.

रांगी ड्रेनची नियमित साफसफाई तसेच तणनाशक औषधांची फवारणी करण्यासाठी अंदाजे दोन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हा निधी दरवर्षी उपलब्ध करून दिल्यास नाल्याची वेळेत स्वच्छता करता येईल आणि शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यास मदत होईल, असे चौगले यांनी निवेदनात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular