Friday, May 1, 2026
HomePoliticalपन्हाळ्यातील पर्नाल मंडळाच्या वतीने लोकसंस्कृतीचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर' 'आनंद गिरी, यांचा नागरी...

पन्हाळ्यातील पर्नाल मंडळाच्या वतीने लोकसंस्कृतीचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर’ ‘आनंद गिरी, यांचा नागरी सन्मान.

पन्हाळा प्रतिनिधी- पन्हाळ्यातील आपटी गावचे रहिवासी व लोकसंस्कृतीचे अभ्यासात प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरी

 यांचा नुकताच नागरी सन्मान सोहळा झाला. पन्हाळ्यातील पर्नाल इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते प्राध्यापक आनंद गिरी यांना गौरविण्यात आले .तर त्यांच्या ‘गाव कुसाचे सोबती; या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पर्नाल .इतिहास संशोधन मंडळ आणि मुलुख गिरी प्रकाशन यांच्या वतीने पन्हाळा तालुक्यातील आपटीचे सुपुत्र प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरी यांचा नागरी सत्कार संस्थेच्या भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरी यांचा सत्कार करून पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. गिरी यांचा लोकसंस्कृतीबाबत संशोधनात्मक कार्य युवा पिढीसाठी दिशादर्शक आहे. त्यांनी जपलेला लोक परंपरेचा वारसा प्रेरणादायी आहे. असे सौभाग्यवती महाडिक म्हणाल्या .वाचन संस्कृती जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केले. भागीरथीच्या झिम्मा फुगडी स्पर्धेमध्ये लोकसंस्कृती टिकून राहण्यासाठी स्वतंत्र 25 हजारांचे बक्षीस दिले जाईल असं महाडिक यांनी जाहीर केले .गाव कुसाचे सोबती या पुस्तकात वेगवेगळ्या पंचेचाळीस जातींच्या कार्यपद्धतीचा उल्लेख आहे. या पुस्तकातील लोककलावंतांची माहिती वाचकांना नक्की आवडेल असं प्राध्याप गिरी म्हणाले. दरम्यान नवनियुक्त पंचायत समिती सदस्य मनीषा पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच सुरभी संस्थेच्या 2026 चा पुरस्कार अमित देसाई आणि संदीप पाटील यांना प्रदान करण्यात आला. यावेळी विश्वास पाटील, प्रदीप पाटील, बाजीराव निकम, शिवप्रसाद शेवाळे, संतोष चव्हाण, आशिष पाटील, मनीषा पाटील, मनीषा रानमाळे भगवान सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular