Thursday, April 16, 2026
HomePoliticalमुदत संपलेल्या ग्रामपंचायत वर विद्यमान सरपंच प्रशासक होणार.

मुदत संपलेल्या ग्रामपंचायत वर विद्यमान सरपंच प्रशासक होणार.

बालिंगा :मोहन कांबळे .
राज्यातील ज्या ज्या ग्रामपंचायतचे मुदत संपलेले आहे किंवा फेब्रुवारी 2026 अखेर संपणार आहे अशा ग्रामपंचायती निवडणूक ही पुन्हा सहा महिन्याकरता पुढे ढकलण्यात आली असून राज्य शासनाने आज एक नवीन राजपत्र जाहीर केला असून त्यामध्ये आदेश देण्यात आले आहेत की, विद्यमान सरपंच हाच ग्रामपंचायतचा प्रशासक असेल तसेच ग्रामपंचायतचे जे सदस्य आहेत तेच पुन्हा प्रशासकीय समितीमध्ये काम करतील.
शासनाने आपल्या राजपत्रामध्ये ज्या ग्रामपंचायत मुदत संपलेली आहे, त्या संबंधित ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंचाचे सहा महिन्याच्या कालावधीसाठी किंवा ग्रामपंचायत स्थापनेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत यापैकी जे आधी असेल त्या कालावासाठी प्रशासक म्हणून नियुक्ती करणे तसेच पंचायत चे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विद्यमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन करणे अधिनियम आणि त्याखालील नियमानुसार प्रदान केलेले सर्व अधिकार वापरण्यासाठी आणि कर्तव्याचे पालन करण्यासाठी प्रशासक आणि समित्यांची आवश्यक सूचना निर्गमित केलेले आहे असे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने शासनाचे सहसचिव भरोसे यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र प्रसिद्ध केले आहे.
यामुळे ज्या ग्रामपंचायत मधून संपलेले आहे त्या संचालक मंडळास अनामपणे सहा महिन्याचा कालावधी मिळालेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular