Saturday, April 18, 2026
HomeEducationपन्हाळा विद्यामंदिर मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न.

पन्हाळा विद्यामंदिर मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न.

पन्हाळा प्रतिनिधी-पन्हाळा विद्यामंदिर या प्रशालेमध्ये जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यामध्ये अनेक विद्यार्थिनींनी त्या- त्या काळातील स्त्रियांनी समाज घडणीसाठी आपले आयुष्य वेचले अशा अनेक स्त्रियांची यशोगाथा त्यांच्या पात्रांमधून दाखवण्याचा उत्तम प्रयत्न त्यांनी केला. . काहींनी जिजाऊ, ताराराणी, इंदिरा गांधी, स्मृती मानधना, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, कल्पना चावला, सुनिता विल्यम्स, सावित्रीबाई फुले अशा अनेक पात्रांमध्ये या मुली वावरत होत्या. त्याचबरोबर या सर्व महिलांचे विचार व कर्तुत्व विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचा त्यांचा चाललेला खटाटोप पाहून खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिनामध्ये आपला मोलाचा वाटा आहे याची जाणीव आम्हाला होत होती.
त्यानंतर महिला दिनावर आधारित पाचवी- सहावीच्या मुलींनी नाटिका सादर केली त्यामध्ये भार्गवी बांदिवडेकर, ज्ञानवी पाटील, अमरजा उरुणकर व स्वरा खोत यांनी भाग घेतला होता. त्यानंतर कार्यक्रमाच्या वक्त्या खामकर मॅडम यांनी स्त्रीचे जीवन तिची पूर्वाश्रेणीची अवस्था अनेक स्त्रियांनी मिळवलेला नावलौकिक आपल्या भाषणातून व्यक्त केला. त्यानंतर उरुणकर मॅडम यांनी आत्तापर्यंत ज्या -ज्या स्त्रिया व त्यांचे कार्य याचा आढावा आपल्या उगवत्या शैलीत घेतला. तर अध्यक्षीय भाषणात श्री कवठेकर सर यांनी पूर्वाश्रमीची स्त्री व आत्ताची स्त्री आज पुरुषाच्या बरोबरीने उभी असलेली व आपलं कुटुंब सांभाळणारी स्त्री कशा पद्धतीने आपला आयुष्य जगते आहे आनंदामध्ये आपलं आयुष्य व आपलं कुटुंब सांभाळत असताना तिला कशी तारेवरची कसरत करावी लागते हे विचार मांडले.
या कार्यक्रमासाठी निवेदिका म्हणून ज्योती गायकवाड व धनश्री गिरी -गोसावी यांनी काम पाहिले तर शेवटी आभार इयत्ता नववीतील सिद्धी भोसले हिने मानून या कार्यक्रमाची सांगता झाली.

.

.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular