बालिंगा( मोहन कांबळे): – लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग या कोल्हापूर महानगरपालिका शाळेने जरगनगर पॅटर्न म्हणून राज्यभर नावलौकिक मिळवला आहे.
शाळेचे शेकडो विद्यार्थी राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये शिष्यवृत्ती यादीत चमकले आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये घेतली जाणारी तयारी, व्यक्तिमत्व विकासावर दिला जाणारा भर, गुणवत्तेबरोबरच कला, क्रीडा सांस्कृतिक गुणांना दिला जाणारा वाव यामुळे पालकांचा शाळेकडे ओढा वाढत चालला आहे.
महानगरपालिकेची या शाळेची 2550 इतकी पटसंख्या आहे. एवढी मोठी पटसंख्या असणारी ही राज्यातील सर्वात मोठी शाळा आहे. या शाळेमध्ये इमानेइतबारे मनलावुन आपले काम हिच सरस्वती व विद्यार्थ्यांचा विकास हीच भविष्यातील प्रगती समजणारे ५६ एवढी शिक्षकांची संख्या महानगर पालिकेने या शाळेत ठेवली आहे.
पालकांनी दाखवलेला या विश्वासास पात्र राहून शाळेने आज 410 कुपन वाटप केली आहेत. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच शाळेचे सर्व प्रवेश फुल्ल झाले आहेत.
या शाळेची माहिती पुढील प्रमाणे आहे.
शाळेची पटसंख्या –
2550
सध्या एकूण वर्ग तुकड्या- 55
कार्यरत शिक्षक संख्या-56
पहिलीसाठी दिले जाणारे प्रवेश- 400 ही आजची स्थिती शाळेची आहे.