Saturday, May 2, 2026
HomeSocialपै. शंकर तोडकर यांची कुस्तीतील कामगिरी प्रेरणादायी : प्रा .रघुनाथ मोरे यांचे...

पै. शंकर तोडकर यांची कुस्तीतील कामगिरी प्रेरणादायी : प्रा .रघुनाथ मोरे यांचे प्रतिपादन

सांगरूळ / प्रतिनिधी:
उपमहाराष्ट्र केसरी स्व.पै.शंकर तोडकर यांनी प्रेक्षणीय कुस्त्या करत कुस्ती क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर नाव कमावले .स्वतः चे व गावाचे नाव भारतभर केले . समोरचा प्रतिस्पर्धी कोण आहे हे न पाहता धाडसाने दील न टाकता कुस्ती करणारा एक आक्रमक मल्ल म्हणून त्यांची वेगळी ओळख होती . प्रतिस्पर्धी मल्लांचाही आदर केला .आदर्श घेऊन त्यांच्या मार्गदर्शनामुळे व सहकार्यामुळे गावामध्ये अनेक नामवंत मल्ल घडले असे प्रतिपादन ऑल इंडिया चॅम्पियन पै प्रा. रघुनाथ मोरे यांनी केले .
वाकरे (ता . करवीर ) येथील पैलवान शंकर तोडकर हायस्कूलमध्ये उपमहाराष्ट्र केसरी कै .पैलवान शंकर तोडकर यांची ४० वी पुण्यतिथी साजरी केली यावेळी ते बोलत होते .
अध्यक्षस्थानी जोतिर्लिंग शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे होते .
पैलवान शंकर तोडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ऑल इंडिया चॅम्पियन पै प्रा. रघुनाथ मोरे व पै .परशुराम सूर्यवंशी यांच्या हस्ते केले .यावेळी बोलताना पै परशुराम सुर्यवंशी यांनी स्व .पैलवान शंकर तोडकर हे वाकरे गावचे भूषण होते असे सांगितले .गतिमान व प्रेक्षणीय कुस्त्या करण्यात त्यांची ख्याती होती .कुस्ती क्षेत्रात प्रामाणिक व खिलाडू वृत्तीने केलेल्या वाटचालीमुळे कुस्ती क्षेत्रात त्यांच्या नावाला वेगळे वलय प्राप्त झाले आहे असे सांगितले .
संस्थेचे संचालक ए बी बिरंजे कुंभीचे संचालक व शाळेचे मुख्याध्यापक डॉ .बी बी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले .
यावेळी ज्योतिर्लिंग शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजी तोडकर माजी सरपंच आनंदराव शिंदे महादेव मोहिते प्रा . एस पी चौगले दीपक माने राजेंद्र चौगले मारुती बिरंजे राजाराम माने जयश्री करपे बापूसो आळवेकर बी एम पाटील आर के कांबळे यांचे सह शाळेचे शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक जी डी लव्हटे यांनी केले आभार डी. एस मोरे यांनी मानले .

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular