Saturday, August 22, 2026
HomePoliticalग्रामपंचायत प्रशासकांना अत्यावश्यक बाबीवर खर्च करण्यास मिळणार अधिकार..! - नूतन जिल्हा...

ग्रामपंचायत प्रशासकांना अत्यावश्यक बाबीवर खर्च करण्यास मिळणार अधिकार..! – नूतन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिल्पा खोत

कोल्हापूर |
जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. अशा सर्व ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचांनाच संधी दिली आहे. मात्र त्यांनी कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत असे आदेश शासनाने दिले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते बैठकीत जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा सौ शिल्पा शशिकांत खोत यांनी ग्रामपंचायत प्रशासकांना अत्यावश्यक बाबीवर खर्च करण्यास अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे
नूतन अध्यक्ष सौ खोत यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज सर्व विभाग प्रमुखांचे बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीस राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकीयन यस हे उपस्थित होते
सौ खोत यांनी या बैठकीत सांगितले ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या पाणीपुरवठा योजनेची बिले थकीत आहेत तोंडावर 31 मार्च असल्यामुळे वीज वितरण कंपनी ही कनेक्शन तोडत आहेत त्यामुळे गावागावात असंतोष माजत आहे याशिवाय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार थांबत आहेत शिवाय अतिशय महत्त्वाची काम कामे सुद्धा थांबत आहेत म्हणूनच आजच्या बैठकीत माहिती घेऊन अत्यावश्यक बाबींवर खर्च करण्यास प्रशासकांना अधिकार देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular