Friday, April 17, 2026
HomeEducationपन्हाळा नगरपरिषदेची अभ्यासभेट व बालग्राम अनाथालय भेटीद्वारे संजीवनच्या विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक संवेदनशीलता

पन्हाळा नगरपरिषदेची अभ्यासभेट व बालग्राम अनाथालय भेटीद्वारे संजीवनच्या विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक संवेदनशीलता

पन्हाळा, दि. १० एप्रिल (प्रतिनिधी) — संजीवन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासभेटीचा दुसरा दिवस अत्यंत माहितीपूर्ण व भावनिक अनुभवांनी समृद्ध ठरला. यापूर्वी विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशन व पोस्ट ऑफिसला भेट देऊन त्यांच्या कामकाजाची माहिती घेतली होती. विद्यार्थ्यांनी देशातील उत्कृष्ट नगरपरिषद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पन्हाळा नगरपरिषदेला भेट देऊन तेथील प्रशासनाच्या कार्यपद्धतीची प्रत्यक्ष माहिती घेतली. 📚
या वेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत नगरपरिषदेच्या विविध कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही प्रकट मुलाखतीद्वारे नगरपरिषदेची करप्रणाली, स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी, नगराध्यक्षांची जबाबदारी, नागरिकांची कर्तव्ये तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना याविषयी माहिती जाणून घेतली. तसेच टॅक्स ऑफिसर रवींद्र कुमार यांनीही विविध करप्रणालीबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती दिली. 
यानंतर विद्यार्थ्यांनी पन्हाळा येथील बालग्राम अनाथालयाला भेट देऊन तेथील मुलांशी संवाद साधला. या वेळी अनाथालयाचे व्यवस्थापक हावळ सर यांनी विद्यार्थ्यांना समाजातील अनाथ, गरीब व वंचित मुलांना शक्य तितकी मदत करण्याचे आवाहन केले. या भेटीदरम्यान अनाथ मुलांशी संवाद साधताना अनेक विद्यार्थी भावुक झाले असून त्यांच्या चेहऱ्यावर सामाजिक संवेदनशीलतेची जाणीव स्पष्टपणे दिसून आली.
नगरपरिषदेची अभ्यासभेट आणि बालग्राम अनाथालयातील मुलांशी झालेला सुसंवाद विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील संस्मरणीय अनुभव ठरला. विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे आयोजन अध्यापक पांडुरंग गांजवे, शहाजी मोरे, अमोल राऊत, यशोदा देसाई, वैशाली माळी, ढेरे मॅडम, सुजित चोपडे आणि रितेश सर यांनी प्राचार्य बी आर बेलेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली केले. 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular