Thursday, April 16, 2026
HomePoliticalशिवसेनेच्या प्रतिनिधींनी करवीर मतदारसंघात एसआयआर अभियान जागरूकपणे राबवावे ; आमदार चंद्रदीप नरके...

शिवसेनेच्या प्रतिनिधींनी करवीर मतदारसंघात एसआयआर अभियान जागरूकपणे राबवावे ; आमदार चंद्रदीप नरके यांचे आवाहन

प्रतिनिधी:

 करवीर विधानसभा मतदारसंघात केंद्र शासन राबवत असलेले एसआयआर अर्थात मतदारयादी पुनर्निरीक्षण अभियान शिवसेनेच्या बूथ लेव्हल प्रतिनिधींनी जागरूकपणे राबवावे असे आवाहन करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.

          करवीर विधानसभा मतदारसंघांतर्गत करवीर, पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यातील बूथ लेव्हल प्रतिनिधींच्या बैठकीत आमदार नरके बोलत होते.                     
आमदार नरके यांनी करवीर विधानसभा मतदारसंघात ३५६ बूथ असल्याचे सांगून प्रत्येक बुथला शिवसेनेचा प्रतिनिधी दिला असल्याचे सांगितले. शासनाच्या बीएलओ सोबत शिवसेनेच्या बीएलए यांनी समन्वयातून काम करावे. प्रत्येक घरात सर्वेक्षण करून जिल्ह्यात करवीर विधानसभा मतदारसंघ आघाडीवर न्यावा असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक गावात शिवसेना शाखा,युवा सेना शाखा,महिला आघाडी शाखा उद्घाटन करणार असल्याचे ते म्हणाले.

          गोकुळ दूध संघाचे संचालक अजित नरके यांनी राज्य,जिल्हा, शहरे, तालुके गावे आणि वाड्यावस्त्यावर हे अभियान राबवण्यात येत असल्याचे सांगितले. 

        प्रास्ताविकात जिल्हा उपप्रमुख अजित पाटील (परितेकर) यांनी मतदार यादी पुनरिक्षण अभियान १५ एप्रिल ते १५ मे दरम्यान होणार आहे असे सांगितले.             
यावेळी रामभाऊ मेथे, अजित जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. आभार पन्हाळा शिवसेनाप्रमुख अरुण पाटील यांनी मानले.या सभेला जिल्हा उपप्रमुख संजय पाटील, करवीर तालुकाप्रमुख कृष्णात पोवार, गोकुळचे संचालक एस.आर.पाटील,गगनबावड्याचे माजी सभापती एकनाथ शिंदे, तीन तालुक्यातील बूथ लेव्हल प्रतिनिधी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular