Tuesday, April 21, 2026
HomeEducationडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजन...

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजन -देशभरातून सुमारे ४०० संघांचा सहभाग

कोल्हापूर:

कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दिनांक २४ व २५ एप्रिल २०२६ रोजी राष्ट्रीय स्तरावरील हॅकथॉन ‘हॅकॅत्सोव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी पूर्वनिवड चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत देशभरातील सुमारे ४०० संघांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी अंतिम फेरीसाठी ३० उत्कृष्ट संघांची निवड करण्यात आली आहे. २४ तास अखंड चालणारा हा बहुप्रतिक्षित स्पर्धात्मक महोत्सव तंत्रज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांसाठी मोठे आकर्षण ठरणार आहे.

या टेक फेस्टमध्ये तब्बल ५०,००० रुपये किमतीची बक्षिसे दिली जाणार आहेत. तंत्रज्ञान, कल्पकता आणि सर्जनशीलता यांचा संगम असलेला हा महोत्सव विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये सादर करण्यासाठी उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत असून, डॉ. विनायक पुजारी हे कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून कार्य पाहत आहेत. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular