कळे : कळे–तळेवाडी–कुंभारवाडी या मार्गावरील कळे बाजारपेठेत (दस्तुरी चौक ते पुनाळ फाटा) सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काँक्रीट रस्ता व आरसीसी गटर बांधकाम सुरू असल्याने या भागातील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बंदी २५ एप्रिल २०२६ पासून ३१ मे २०२६ पर्यंत दिवसरात्र लागू राहणार आहे. सदर रस्ता हा कोल्हापूर–गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग (NH 166G) तसेच अनुस्कुरा घाटमार्गे कोकणाला जोडणाऱ्या प्रमुख मार्गांपैकी एक असल्याने येथे मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असते. सध्या सुरू असलेल्या कामात तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत व काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, दस्तुरी चौक ते देसाई गल्ली दरम्यान गटरचे काम पूर्ण झाले असून काँक्रीट रस्त्याचे काम प्रगतीत आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.
👉 पर्यायी मार्ग :
गगनबावडा–अनुस्कुरा हलकी वाहने : आंबेडकर वस्ती–मराठी शाळा चौक मार्गे वळवली जातील
अनुस्कुरा–गगनबावडा हलकी वाहने : पुनाळ फाटा–मराठी शाळा चौक–इंडियन ऑईल पंप मार्ग
👉अवजड वाहने (दोन्ही बाजू) : कोपर्डे फाटा–पडळ फाटा–काटेभोगाव मार्गे पर्यायी रूट.