Friday, April 24, 2026
HomePoliticalविधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये हालचाली; सुरेश हाळवणकर आघाडीवर

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये हालचाली; सुरेश हाळवणकर आघाडीवर

मुंबई:

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप कडून उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून पश्चिम महाराष्ट्रातून सुरेश गणपती हाळवणकर यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत त्यांच्या उमेदवारीवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

9 जागांसाठी निवडणूक

महाराष्ट्र विधान परिषद मधील नऊ सदस्यांचा कार्यकाळ 30 एप्रिल रोजी संपत आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीत विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे जागांचे वाटप होणार आहे.

महायुतीचे गणित

राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या गणितानुसार—

  • भाजपला 5 जागा

  • शिवसेना (शिंदे गट) ला 2 जागा

  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला 1 जागा

उर्वरित 1 जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरत आहे.

भाजपची महत्त्वाची बैठक

भाजपकडील पाच जागांसाठी अनेक इच्छुक मैदानात असले तरी अंतिम निर्णयासाठी आज कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे,अतुल सावे आणि रावसाहेब दानवे यांसारखे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

हाळवणकर यांची दावेदारी मजबूत?

2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी हाळवणकर यांना उमेदवारीपासून थांबवण्यात आले होते. त्याऐवजी राहुल आवाडे यांना संधी देण्यात आली होती. त्या वेळी विधानपरिषदेची संधी देण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा होती.

आता या पार्श्वभूमीवर सुरेश हाळवणकर यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular