Sunday, April 26, 2026
HomeCrimeजमिनीच्या वादातून वाघूरडेत हाणामारी, कळे पोलीसात गुन्हा दाखल

जमिनीच्या वादातून वाघूरडेत हाणामारी, कळे पोलीसात गुन्हा दाखल

कळे: वाघुर्डे (ता. पन्हाळा) येथे जमिनीच्या वादातून हाणामारी झाली. दोन्हीकडील मिळून सत्तावीस जणांवर कळे पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल झाली आहे. 

अश्विनी बाजीराव पाटील यांच्या फिर्यादीनुसार, फिर्यादी व त्यांच्या सासू लीलाबाई या सकाळी साडे अकराच्या सुमारास जनावरांच्या गोठ्यात गेल्या होत्या. यावेळी तानाजी हिंदूराव केसकर, सरिता केसकर, तेजस केसकर, अनुराधा केसरकर, पंडित केसरकर, बबिता केसकर, सुदेश केसरकर, हिंदुराव केसकर, ओंकार केसरकर, दिलीप केसकर, सुप्रिया केसकर, संगीता पाटील, सरदार पाटील यांनी एकत्र येत फिर्यादीवर काठी, पारळी, विळा घेऊन हल्ला करून मारहाण केली. तसेच ‘ तुम्ही इनाम शेतात असलासा तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही.ती शेती माझी आहे. तिथे आम्ही प्लॉट पाडणारआहे.’ अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. 

   सविता तानाजी केसरकर (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बाजीराव पांडुरंग पाटील, युवराज पांडुरंग पाटील, लक्ष्मी दिनकर रेवडे, अनिकेत युवराज पाटील, राजवर्धन युवराज पाटील, अनुराधा युवराज पाटील, अश्विनी बाजीराव पाटील, लीलाबाई पांडुरंग, व अनोळखी पाच ते सहा लोक यांनी फिर्यादी सविता केसरकर यांच्या शेतामधील कंपाऊंड व बोर्ड काढून कोयता, काठी व लोखंडी गजाने मारहाण करून, शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तसेच सासरे हिंदुराव ईश्वरा केसरकर (वय ७०) यांना मारहाण करून जखमी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular