Monday, May 4, 2026
HomeSocialपाडळी खुर्द ते कोगे दरम्यानच्या रस्त्यावर मद्यपीचा ओपन बार; रिकाम्या बाटल्यांचा खच....

पाडळी खुर्द ते कोगे दरम्यानच्या रस्त्यावर मद्यपीचा ओपन बार; रिकाम्या बाटल्यांचा खच. मद्यपीच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त..

बहिरेश्वर प्रतिनिधी…

करवीर तालुक्यातील मौजे पाडळी खूर्द ते कोगे दरम्यानच्या भररस्त्यात मद्यपीनी रिकाम्या दारुच्या बाटल्या टाकुन ढिगारेच्या ढिगारे तयार केले आहेत..काही तरुणांनी बिअर आणि दारुच्या रिकाम्या बाटल्या एकत्रित केल्या..
व त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत *चाललंय तरी काय*** अस कॅप्शन दिल आहे..तरी पोलीस प्रशासनाने अशा ओपन बार वर धाडी टाकून मद्यप्रेमींना चांगलाच पोलीस खाक्या दाखवून देणे गरजेच आहे…या तळीरामांच्या उपद्रवामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे..तरी प्रशासनाने याची गंभीर दखल घेत कारवाई करावी अशी मागणी पाडळी गावचे लोकनियुक्त सरपंच नेताजी उर्फ तानाजी पालकर यांनी केली आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular