Monday, May 4, 2026
HomeAdministrationगोकुळ दूध संघावर प्रशासक मंडळाची नियुक्ती

गोकुळ दूध संघावर प्रशासक मंडळाची नियुक्ती

पुणे, दि. ४ मे २०२६ — कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ)च्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे संघाच्या कामकाजात निर्माण झालेली पोकळी दूर करण्यासाठी शासनाने प्राधिकृत अधिकारी मंडळाची नियुक्ती केली आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील संबंधित तरतुदींनुसार राजकुमार पाटील विभागीय उपनिबंधक (दुग्ध), पुणे विभाग, पुणे  यांनी हा आदेश जारी केला आहे.

नियुक्त प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून सातारा येथील जिल्हा उपनिबंधक संजयकुमार विश्वनाथ सुद्रीक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सदस्य म्हणून प्रदीप महावीर मालगावे (सहायक निबंधक, चंदगड), सुनिल रामचंद्र धायगुडे (सहायक निबंधक, मुळशी), सागर बलकवडे (लेखापरीक्षक) आणि चंद्रकांत परूळेकर (कक्ष अध्यक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर) यांचा समावेश आहे.

हे प्राधिकृत अधिकारी मंडळ संघाचे दैनंदिन कामकाज पाहणार असून त्यांना कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी संबंधित प्राधिकरणाची पूर्वपरवानगी आवश्यक राहणार आहे.

सदर आदेश ४ मे २०२६ रोजी पुणे येथे जारी करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular