Sunday, May 10, 2026
HomeCrimeगणेशवाडी येथे एकाची आत्महत्या.

गणेशवाडी येथे एकाची आत्महत्या.

बहिरेश्वर प्रतिनिधी : गणेशवाडी ( ता. करवीर ) येथील दत्तात्रय तुकाराम माने ( वय ६५ ) यांनी आत्महत्या केली. गेल्या पाच दिवसापासून ते बेपत्ता होते. शुक्रवारी ( ता. ८ ) रोजी सकाळी गणेशवाडी तलावाच्या शेजारी असणाऱ्या झूडपात त्यांचा मृतदेह आढळून आला. सकाळी करवीर पोलीस ठाण्यात याबाबतची वर्दी देण्यात आली. त्यांच्या पत्नीचे कांही वर्षापूर्वी निधन झाल्या मुळे ते निराश होते. त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा अंदाज आहे. मृतदेह सडल्यामुळे पोलीस हवालदार राजेंद्र संकपाळ, सुमित पोवार, पोलीस पाटील व शिरोली दुमाला प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर सुहास भोई यांच्या उपस्थितीत जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या मागे सून, दोन मुले, सून, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार ( ता. १० ) रोजी सकाळी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular