कोल्हापूर : गोकुळ दूध संघ हा मल्टीटेस्ट होऊ नये यासाठी आमचा लढा कायम असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा दूध संघ राहिला पाहिजे, गोकुळ दूध संघात चांगल्या विचारांची माणसं गेली पाहिजेत,अशी भावनिक साद काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी सभासदांना घातली.
भुयेवाडी (ता.करवीर) येथील संजय पाटील यांच्या गायीच्या गोट्याला आमदार पाटील यांनी भेट दिली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले, गोकुळ दूध संघाचा नेतृत्व करत असताना गेल्या पाच वर्षात सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतली. स म्हशीच्या दुधाला दोन रुपये जादा देतो असे आम्ही सत्तेत येण्यापूर्वी सांगितले होते. मात्र, दहा ते बारा रुपये दरवाढ देण्याचा आम्ही निर्णय घेतला. गाईच्या दुधाला आठ ते दहा रुपये ज्यादा दिल्याने शेतकरी समाधानी आहे. दूध व्यवसाच्या मदतीने शेती व्यवसायाला प्रतिष्ठा देण्याचं काम गोकुळच्या माध्यमातून आम्ही करत आलो आहोत. शेतकऱ्यांच्या दूधाला चांगला दर देण्याचे आश्वासन पुर्ण करताना ५ वर्षाच्या कार्यकाळात म्हैशीच्या दूधाला प्रतिलिटर १४ तर गाईला १० रुपये वाढीव दर दिला आहे. पशुखाद्यामध्ये कोणतीही दरवाढ न करता उलट त्यामध्ये ५० रूपयांची कपात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक तरूण आता सक्षम झाला आहे. नोकरीपेक्षा जास्त पैसे हे दूध व्यवसायमध्ये मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या योजना गोकुळच्या माध्यमातून राबवण्यात आल्या. दूध उत्पादक शेतकऱ्यांना हिताचे काम गेल्या पाच वर्षात आम्ही काम केले. साडेपाच लाख शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा गोकुळ ठेवण्याचे काम आजपर्यंत केले आहे.
यावेळी गोकुळचे माजी संचालक बाबासाहेब चौगले, जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील, सरपंच सचिन देवकुळे, शिवाजीराजे दूध संस्थेचे चेअरमन संभाजी खोत, सतीश पाटील, अमित पाटील, सरदार पाटील, सागर पाटील, विकास पाटील, तानाजी पाटील, बी. डी. पाटील, अभिजीत पाटील, प्रकाश पाटील, विकास चौगले, प्रकाश खाडे, दत्ता शिंदे आदी उपस्थित होते.
.