Tuesday, June 2, 2026
HomePoliticalअपात्र दूध संस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी अपील करणार: आमदार सतेज पाटील

अपात्र दूध संस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी अपील करणार: आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : भावकीचा वाद आता दूध उत्पादक शेतकऱ्यावरती आला आहे. महायुतीचा फटका दूध संस्थांवर झाला असून अपात्र झालेल्या दूध संस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी अपील करणार असल्याची माहिती काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी दिली.
गोकुळ दूध संघाच्या 5470 संस्थेची यादी फायनल करण्यात आली होती. परंतु यापैकी 1320 दूध संस्था अवसायनात असल्याची तक्रार महादेव दूध संस्थेच्या वतीने करण्यात आली होती. विभागीय निबंधक यांच्या कार्यालयांतर्गत सुनावणी होऊन एकूण 427 दूध संस्था अपात्र करण्याचा निर्णय देण्यात आला आहे. यावर आमदार सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत भावकीच्या वादात आता दूध उत्पादकांच्या वरती अन्याय होत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, महायुतीमुळेच या दूध संस्थांवर अन्याय होत आहे. या संस्थेंमधील अनेक संस्था संचालक मंडळींची भेट झाली आहे. आम्ही सर्वजण एकत्र मिळून पुढे अपील करणार आहोत. या सर्व दूध संस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढील न्यायप्रविष्ठ बाबी पूर्ण करणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular