Tuesday, June 30, 2026
HomePoliticalजनसुराजच्या मेळाव्याला नवीद मुश्रीफ यांची उपस्थिती

जनसुराजच्या मेळाव्याला नवीद मुश्रीफ यांची उपस्थिती

कोल्हापूर, दि. 30:
जनसुराज्य शक्ती पक्षाचा गोकुळ ठरावधारकांचा मेळावा कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लबमध्ये आयोजित केला होता. या मेळाव्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव व गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची उपस्थिती होती.

जनसुराज्यचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. विनयरावजी कोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात अमर पाटील यांनी स्वागत केले. आमदार अशोकराव माने, जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष सुमित कदम, करणसिंह गायकवाड, केडीसीसीचे माजी संचालक सर्जेराव पाटील- पेरीडकर यांची मनोगते झाली.

यावेळी बोलताना जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनयरावजी कोरे म्हणाले, गेली पाच वर्षे अतिशय चांगला कारभार झालेला आहे. नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी सर्वच नेतेमंडळी व सहका-यांना विश्वासात घेऊन काम केलेले आहे.

श्री. नवीद मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जनसुराज्यचे नेते व आमदार डाॅ. विनयरावजी कोरे यांचे निमंत्रण आल्यामुळे मी त्या मेळाव्याला गेलो होतो. जनसुराज्य हा महायुतीमधील एक महत्त्वाचा पक्ष आहे. आम्ही सर्वजण महायुती म्हणूनच या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.
==========

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular