दोनवडे :करवीर तालुक्यातील साबळेवाडी येथील उत्तम पाटील यांचा तीन वर्षाचा मुलगा रियांश (वय 5 )हा आज दुपारी खेळता खेळता गोबर गॅसच्या खड्ड्यात पडला. त्यातच तो जखमी झाला.त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले होते परंतु दुर्दैवाने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अवघ्या पाच वर्षाच्या बालकाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने साबळेवाडी सह परिसरात शोककळा पसरली आहे. रियांश हा एकुलता एक होता. रात्री उशिरा साबळेवाडीतील स्मशानभूमी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.