Wednesday, July 22, 2026
HomeSocialभुयेवाडी येथे दिग्विजय खानविलकर फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

भुयेवाडी येथे दिग्विजय खानविलकर फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

भुयेवाडी (ता. करवीर) : कै. माजी मंत्री दिग्विजय खानविलकर फाउंडेशनच्या वतीने पशुवैद्यकीय दवाखाना, भुयेवाडी येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार पडला.

या उपक्रमात विश्वविजय खानविलकर आणि वीरविजय खानविलकर यांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. फाउंडेशनच्या वतीने फुलझाडे, फळझाडे, जंगली तसेच पर्यावरणपूरक विविध वृक्षांची लागवड करून हरित परिसर निर्मितीचा संकल्प करण्यात आला.

यावेळी संभाजी पाटील, बी. जे. पाटील, रंभाजी भोसले, गणेश चौगुले, मोहन तळेकर, अभिजीत शिंदे, ओंकार पाटील, उमेश पाटील, प्रकाश जगताप, ज्ञानदेव पाटील, मायाप्पा अष्टेकर, शामराव वाघमोडे, दादासो पाटील, सागर शिंदे, भीमराव नांगरे, संभाजी खोत, संतोष काईंगडे, विवेक पाटील, मनीष काशीद, रंगराव खाडे, दिनकर माने, सर्जेराव पाटील, किरण काईंगडे, दिलीप साळुंखे, रामदास तळेकर यांच्यासह परिसरातील असंख्य कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प व्यक्त केला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असून, भविष्यातही फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular