Friday, July 31, 2026
HomeAdministrationलैंगिक छळ निवारण समितीवर अभिजीत बोरगे

लैंगिक छळ निवारण समितीवर अभिजीत बोरगे

कोल्हापूर : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ अनुसार, शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयात अंतर्गत समिती, जिल्ह्याच्या ठिकाणी स्थानिक समिती स्थापन करणे बंधनकारक आहे 

  या दोन्ही समितीवर अशासकीय सदस्य म्हणून खुपीरे तालुका करवीर येथील अभिजीत दत्तात्रय बोरगे यांची महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागा कडून ही नियुक्ती करण्यात आली आहे. महिलांच्या लैंगिक छळ तक्रारीबाबत ही समिती जिल्हास्तरावर कार्यरत राहणार आहे. या समितीकडून विशाखा आदेशाचे आणि कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधिनियम 

2013(प्रतिबंध, मनाई आणि निवारण) नुसार चौकशी करण्याचे अधिकार आहेत. अभिजीत बोरगे हे वरिष्ठ पत्रकार दत्तात्रय बोरगे  यांचे चिरंजीव तसेच Ab9 मराठी न्यूज चॅनेलचे कार्यकारी संपादक आहेत. त्यांनी सामाजिक कार्याबरोबरच रेल्वेच्या चाईल्ड लाईन प्रकल्पावर समन्वयक म्हणून उल्लेखनीय काम केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular