Tuesday, August 11, 2026
HomeSocialजागतिक आदिवासी दिन कोल्हापुरात उत्साहात साजरा;गुणवंतांचा गौरव आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन

जागतिक आदिवासी दिन कोल्हापुरात उत्साहात साजरा;गुणवंतांचा गौरव आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन

कोल्हापूर, दि. 10 ऑगस्ट २०२६ :
‘जल, जंगल, जमीन आणि अस्मिता’ या घोषवाक्याने प्रेरित जागतिक आदिवासी दिन कोल्हापुरातील फुलेवाडी परिसरात उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन आणि आदिवासी समाज, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला आदिवासी समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र ठोकळ उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार संजय वळवी, संतोष आंबेकर, डॉ. दुर्गेश वळवी, स्वागताध्यक्षा मंगल भिसे, पुणे विभागीय अध्यक्ष भगवंत शिंगाडे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुभाष धादवड यांच्यासह जनार्दन सुरकुले, जनार्दन भोईर, निंबा भांगरे, दत्ता पारधी, हनुमंत खोटरे, नारायण भोमाळे, काशिनाथ लांडे, शिवाजी मरभळ, वृषाली लोकरे, सुषमा तारडे, शुभांगी रावते, नितीन गभाले आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

शिक्षण आणि समाज संघटनेवर भर

कार्यक्रमात मान्यवरांनी आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि देशाच्या विकासातील योगदानावर प्रकाश टाकला. रवींद्र ठोकळ यांनी आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘शिक्षण हेच आदिवासी समाजाच्या प्रगतीचे प्रभावी साधन आहे,’ असे त्यांनी सांगितले.

नायब तहसीलदार संजय वळवी यांनी शासनाच्या विविध योजना आणि त्यांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. मंगल भिसे, संतोष आंबेकर आणि डॉ. दुर्गेश वळवी यांनी समाज संघटन, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक प्रगतीच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.

आदिवासी समाजभूषण पुरस्काराने गौरव

यावेळी आदिवासी समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक श्री. खेवजी दाते तसेच राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त श्री. भगवंत शिंगाडे यांना ‘आदिवासी समाजभूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

गुणवंत विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार

कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सत्कार सोहळ्यात इयत्ता चौथी, पाचवी, सातवी, आठवी, नवोदय, दहावी आणि बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

याशिवाय विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. गुणवंतांच्या सत्कारावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले.

आदिवासी संस्कृतीचे रंगारंग दर्शन

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आदिवासी संस्कृतीचे विविध रंग उपस्थितांना अनुभवायला मिळाले. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत तारपा नृत्य, तर बालकांनी आदिवासी गीते आणि लोकनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ढोल-ताशांच्या गजरात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून आदिवासी समाजाची समृद्ध परंपरा, लोककला आणि जीवनशैलीचे प्रभावी दर्शन घडले.

एकता आणि प्रगतीचा संकल्प

जागतिक आदिवासी दिनाचा हा सोहळा केवळ सांस्कृतिक उत्सव न ठरता आदिवासी अस्मिता, सामाजिक एकता, शिक्षण आणि प्रगतीचा संकल्प करणारा ठरला. ‘आम्ही निसर्गाचे रक्षक, आम्ही देशाचे भूषण’ या घोषणांनी फुलेवाडी परिसर दुमदुमून गेला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रुपेश नाडेकर, शंकर भोईर, अमित पुटकुले, सुभाष तारडे, किरण ठोंगिरे, निवृत्ती वालकोळी, सुनील रावते, मच्छिंद्र बगाड, ओमकार वालकोळी, शंकर पोटे, संतोष मोरमारे आणि प्रभाकर केंगले यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular