कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. संजय श्रीपतराव शिंदे यांची दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या चेअरमनपदासाठी श्री. जयकुमार रेळेकर यांनी संजय शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर श्री. श्रीकांत चव्हाण यांनी अनुमोदन दिले.
निवडणूक सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी म्हणून श्री. यू. एस. उलपे, कार्यालय अधीक्षक, अधिन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर हे उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीने सहकार क्षेत्रात उल्लेखनीय आणि पारदर्शक कारभारामुळे नावलौकिक मिळविला आहे. जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची मातृसंस्था म्हणून या संस्थेने सभासदांच्या कुटुंबीयांच्या शिक्षण, आरोग्य आणि कौटुंबिक उत्कर्षासाठी सातत्याने मोलाचे योगदान दिले आहे.
चेअरमनपदी निवड झाल्यानंतर संजय शिंदे यांनी संस्थेच्या सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची ग्वाही दिली. संस्थेचा नावलौकिक अधिक वाढविण्यासाठी निश्चित नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यात येईल. तसेच सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व संचालकांच्या सहकार्याने संस्थेचा कारभार सभासदांच्या हिताचा, पारदर्शक आणि काटकसरीचा ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
निवडीवेळी उपाध्यक्ष जयकुमार रेळेकर यांच्यासह संचालक बाज पाटील, नंदिप मोरे, श्रीकांत चव्हाण, रविंद्र जरळी, सुनिल पाटील, साताप्पा मगदूम, सुधाकर कांबळे, सचिन गुरव, उत्तम वावरे, रणजित पाटील, मुजम्मिल नावळेकर, अमर पाटील, जितेंद्र वसगडेकर, राहूलराज शेळके, सुरेश सुतार, अजय शिंदे, सरदार दिंडे, सरोजनी कोरी आणि सोनाली गुरव उपस्थित होते.
तज्ञ संचालक प्रविणकुमार पाटील व स्वप्निल घस्ते यांचीही उपस्थिती होती.
संस्थेचे मार्गदर्शक एम. आर. पाटील, विश्वास साबळे, महावीर सोळांकूरे, एम. एम. पाटील, के. आर. किरूळकर, राजाराम वरूटे, राजीव परीट, रविकुमार पाटील, मनोहर भाट, साताप्पा मोहिते, अजित मगदूम, शांताराम माने, विजय टिपुगडे, प्रतिभा शिर्के, एन. डी. पाटील, अनिल आवळे, किरण मगदूम आणि दगडू परीट यांनी नूतन चेअरमन संजय शिंदे यांचे अभिनंदन केले.